Wednesday, December 23, 2015

Adi Guru GuruDev Datt Jayanti

आदिगुरु गुरुदेव जयंति 
!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 
दिगंबरा  दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.

दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ
🚩१] दत्त : दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’
याची अनुभूती देणारा. प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक
जण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देव
आहे’, हेच सत्य आहे. त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही.
आपल्याला याची जाणीव झाली, तर आपण
प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. या दत्त जयंतीला ही जाणीव
जागृत करण्याचा आपण निश्चय करूया..
🚩२] अवधूत : जो अहं धुतो, तो अवधूत ! अभ्यास
करतांना आपल्या मनावर ताण येतो ना ? खरेतर अभ्यास
करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण
‘अभ्यास करणारा मी आहे’, असे वाटल्याने ताण येतो. हाच
आपला अहंकार आहे. दत्त जयंतीला आपण प्रार्थना करूया, ‘हे
दत्तात्रेया, माझ्यातील अहं नष्ट
करण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे....’
🚩३] दिगंबर : दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहे
असा ! जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व
दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर ! जर
ही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्य
जिवांनी त्याला शरणच जायला हवे. तसे केल्यासच
आपल्यावर त्याची कृपा होईल .     🙏 ॐ जय गुरुदेव दत्त 🙏

दत्ताच्या परिवाराचा भावार्थ
🚩४] गाय : दत्ताच्या मागे असलेली गाय
ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनू
आपणाला जे हवे, ते सर्व देते.
पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात.…
🚩५] ४ कुत्रे : हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४
वेदांचे प्रतीक आहेत.…
🚩६] औदुंबर वृक्ष : दत्ताचे पूजनीय रूप ! या वृक्षात दत्त तत्त्व
अधिक आहे.…
🚩७] मूर्तीविज्ञान
दत्ताच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पुढील प्रमाणे
आहे
🚩८] कमंडलू आणि जपमाळ : हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे.…
🚩९] शंख आणि चक्र : श्री विष्णूचे प्रतीक आहे.…
🚩१०] त्रिशूळ आणि डमरू : शंकराचे प्रतीक आहे.…
🚩११] झोळी : ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन
दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो. 💐💐💐🌼🌼

No comments:

Blog Archive